गोंदिया जिल्हा
Category:
शहरे आणि गावेराज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांची ही जन्मभूमी. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता.