No Picture
साहित्य - ललित

रोगा’यण !!

Category:

 

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे !

No Picture
साहित्य - ललित

कोट

Category:

 

आजकाल लग्ना – कार्यात घालण्याच्या कपड्याचे एक नवच खूळ निघालंय. ‘इथनिक ‘ ड्रेसच ! साधारण संदलच्या उंटाच्या पाठीवर जसा भडक रंगाचा मद्रा
घालतात तसल्या जातिकुळीतल्या कापडाचा लांब बंद गळ्याचा शर्ट (म्हणू का नेहरूशर्ट का कोट माझेच मत पक्के नाही), त्यावर बटबटीत सोनेरी, चंदेरी कशिदाकारी आणि खाली चुडीदार पैजामा. उंच्या पुऱ्या पुरुषांना हा ड्रेस शोभून हि दिसतो.

No Picture
साहित्य - ललित

मास्तर, शिक्षक आणि गुरुजी

Category:

 

इतिहासाची पुनरावृत्ती होते ” हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय . याला माझ्या पेक्षा माझे शालेय जीवन ,शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत . ‘इतिहास ‘ तसा रंजक विषय पण आमच्या काळी इतिहासच काय पण समग्र शिक्षणाच्याच सानिध्यात रंजकता येऊ नये अशी ठाम भूमिका सर्वानी घेतली असावी ! युद्ध वर्णना पेक्षा सनावळी आणि तहाची कलमेच ज्यास्त ! या सनावळी आणि तहाच्या कलमानी , आमची या विषयाची आवड ‘कलम ‘ केली ! आम्ही फक्त परीक्षे पुरत्याच आमच्या ‘कलमा ‘ झिजवल्या हे बारीक खरे आहे !

No Picture
साहित्य - ललित

हा क्रमांक अस्तित्वात नाही !

Category:

 

आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते !

No Picture
साहित्य - ललित

पेटलाच कि

Category:

 

मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात .

No Picture
साहित्य - ललित

राम कहाणी !

Category:

 

मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली .

No Picture
साहित्य - ललित

काय कुत्रा पाळताय ?

Category:

 

“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली ,

No Picture
साहित्य - ललित

मेरी

Category:

 

मला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते .

No Picture
साहित्य - ललित

चांदी – लघुकथा

Category:

 

आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे . पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही . कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच . सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा . वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबिड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला एक एक गाडी शिट्टी मारून जाते . बाकी शुकशुकाटच असतो .

No Picture
साहित्य - ललित

दयाघन – लघुकथा

Category:

 

तुम्ही कधी ‘ दयाघन ‘ नामक संस्थेचं नाव ऐकलंय का ? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं . पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात . सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय . या ‘दयाघनावर ‘ माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो .