अझरबैजान
Category:
शहरे आणि गावेअझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.