स्वाझीलँड
Category:
शहरे आणि गावेस्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.