No Picture
कथा

नवरात्र …माळ तिसरी

Category:

 

रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय …. जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत … तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं … कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..

No Picture
कथा

नवरात्र …पहिली माळ !

Category:

 

आमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे … कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत … मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे .

माणसं जोडणारी , आमच्या घरदाराला एकत्र बांधणारी , हौसेने वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालणारी .. आमची आजी ! तिला तिचा भाऊ अभिमानाने गौरी म्हणे . कारण तिचं सुंदर रुप …उंच शेलाटा बांधा , गौरवर्ण , हसरा चेहरा , मोठया केसांची वेणी .. त्यावर माळलेले अनंताचे फुल .. अगदी रोज हं … रोज पहाटे आन्हिकं आवरून घरामागच्या बागेत जाउन फुलं गोळा करायची आणि देवपूजा झाली की आपणही एक फुल हौशीने माळायचं ..आणि मुलींना सुनेला ही घालायला लावायचं .. फुलांची दांडगी हौस , ही तिच्याकडून आईकडे आणि नंतर माझ्या कडे अशी झिरपत आलीये … गाण्याचा कान …गाणं म्हणायची हौस , वाचनाची आवड ….

No Picture
कथा

सिद्दाबाबाची खोली

Category:

 

सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते.

No Picture
कथा

तो ची एक पाठिराखा

Category:

 

(लेखक – विवेक माधव, आम्ही साहित्यिक ग्रुप) बबन्या. एक सर्वसाधारण हमाल. रोज हमाली करून जे मिळेल त्यात समाधानाने गुजराण करणारा एक सामान्य माणूस. आज तो एका कारखान्या बाहेर उभा होता. तो कारखाना होता मुर्त्यांचा. आज गणेश चतुर्थी. कितीतरी लोक आपण निवडलेले गणपती आज त्या कारखान्यातुन आपल्या घरी नेत होते. त्यांना गणपतीची मुर्ती उचलून देताना तो मदत करत होता. कोणी काही बिदागी दिली तर……

No Picture
कथा

गॊष्ट एका राणीची (निकाल)

Category:

 

इयत्ता नववी मध्ये ८६% मिळवून सईने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.राणीला एवढ वाईट वाटलं नव्हत तसं, कारण नववीच्या वर्षाचा शेवटचा गणिताचा पेपर तिला खूप कठीण गेला होता तेपण फक्त एका गणितामुळे.

No Picture
लेखसंग्रह

श्रीकृष्ण जन्माष्टमी-आशय व महत्व

Category:

 

‘जन्माष्टमी”’ म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

No Picture
लेखसंग्रह

निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार

Category:

 

वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख.

No Picture
लेखसंग्रह

लडाख मधील पेंगौंग लेक

Category:

 

पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो.

alsand-mandire-02
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील ‘देवळांचे गाव’ – आळसंद

Category:

 

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची! आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते.