जग दिसते तसे नसते
Category:
साहित्य - ललितएक पिटुकला उंदीर होता. त्याने आपल्या बिळाबाहेरचे जग पाहिले नव्हते.. बाहेर जावे आणि सारे जग पाहून यावे असे त्याला सतत वाटत असे. एकदा त्याला त्याच्या आईचा मूड चांगल असल्याचे दिसले. त्याने पटकन आईला विचारले, ‘आई, मी जरा बिळाबाहेर फिरून येऊ का?” आई म्हणाली, ‘ हो जा ना. पण जरा सांभाळून जा बरं का?’ थोड्या वेळानंतर पिटुकला उंदीर बिळाबाहेरच्या जगात होता. तोच त्याला एक कोंबडा दिसला. कोंबड्याचा लालभडक तुरा आणि कर्कश आवाज ऐकून उंदीर घाबरला. तो घाबरून कोंबड्यापासून वेगाने दूर पळाला. त्याला वाटले हा भयंकर प्राणी दिसतो आहे.
