carrots-bunch-300
खाद्ययात्रा

गाजर – निसर्गाची अमूल्य देणगी

Category:

 

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो.

Uttapam-300
खाद्ययात्रा

विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा

Category:

 

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. त्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.

No Picture
साहित्य - ललित

माझी कोकणची सहल – पावशीच्या जंगलात काढलेली एक रात्र

Category:

 

डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक लटकावून जंगलात घुसायच आणि मनमुराद भटकायचं हा याचा छंद..बंदूक स्व-संरक्षणासाठी, शिकारीसाठी नव्हे..असाच शहरतील काही मित्रांसमवेत एकदा जंगलात गेला असता त्याला जंगलात जंगलात मुक्काम करण्याची कल्पना सुचली व लगेच दुसऱ्या दिवशी बापूने ती अमलातही आणली. सोबत तेच शहरातले मित्र होते..ते तर जंगलातील मुक्काम ह्या कल्पनेनेच वेडे झाले होते व ती रात्र त्याची जंगलात काढली..त्याचे फोटो बापूने फेसबुकवर टाकलेले मी पहिले आणि एकदा तरी बापुसोबत जंगलत मुक्काम करण्याचा निश्चय केला आणि लगेच काही दिवसात तो अंमलातही आणला. हरकुळ खुर्दच्या नंतरचा मुक्काम आम्ही बापूकडे पावशीच्या जंगलात करण्याच ठरवल होत..

No Picture
साहित्य - ललित

माझी कोकणची सहल – कोकणचं ‘जरा हटके’ रुपडं

Category:

 

कोणताही पाणवठा रात्रीच्या वेळेस असाही गुढगर्भ वाटतोच परंतू हरकुळ खुर्दच्या ह्या तलावास देवाधर्माने भारलेल्या कोकणाची पार्श्वभुमी असल्यामुळे या जलाशयास एक वेगळेच परिमाण मिळाले होते..सर्वांचीच समाधी लागली होती..हा आनंद शब्दात नाही उतरवता येत.

पुन्हा घरी आलो आणि तांदळाच्या ऊन ऊन भाकरी, काळ्या वाटण्याची (चिकनचा मसाला घालून केलेली) भाजी, वरण आणि भात खाऊन निवांत झोपी गेलो. हे आणखी एक वैशिष्ट्य. रासमांकडे प्राधान्यांने केवळ कोकणी पदार्थच रसदार कोकणी मसाल्यांमधे करून दिले जातात.

No Picture
साहित्य - ललित

मला भेटलेली माणसं – दिल्लीचा सचिन

Category:

 

बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात ठेवतात या सर्वसामान्य मनुष्यस्वभावाला अनुसरून मी वागलो..ती चांगली गोष्ट सांगणं माझं कर्तव्य आहे..

No Picture
साहित्य - ललित

शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..

Category:

 

आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..

p-595-corn
खाद्ययात्रा

पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

Category:

 

मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.

chinese-bhel-300
खाद्ययात्रा

चायनिज भेळ

Category:

 

लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा.

No Picture
साहित्य - ललित

हे माझ्या सदैव लक्षात राहील

Category:

 

माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे.