खरे श्रेष्ठत्व

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।।

कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।

निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।।

मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।

विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।।

प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरवियले ।।

दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।।

विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।

मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।।

स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।

आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।।

युक्ति चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।

घारीच्या द्दष्टीतील तिक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।।

कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी श्वसानी जे हरवले ।।

नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।।

उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।

आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।।

दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।

सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।।

हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।

जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।।

मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९०४०७९८५०

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।।

कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।

निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।।

मानवाच्या हाती लागली । ‘कला’ कल्पकतेची ।।

Author