कोण जाणे कसे ठांवे

कोण जाणे कसे ठांवे,मन आज भरून आले,
आठवणींच्या आभाळात,
एकेक ढग जमा झाले,--||१||

बघता बघता एकमेकात,
ते कसे खेळू लागले,
हृदयांतरी स्मृतींचे मग,
बिलोरी आरसे हलू लागले,--||२||

स्मरणांच्या हिंदोळ्यावर,
झोके घेत झुलू लागले,
इकडून तिकडे पाय हलवत,
मन सैरावैरा धावू लागले,--||३||

गतकाळाचा जोर घेऊन,
हिंदोळा वारंवार हाले,
वरती जाता क्षणिक सुख,
भासते कधी उगीच खरे,
खाली येता त्याच सुखाचे,
दुःखात रूपांतर का बरे,--||४||

खाली असता ओढ वरची,
पाय मुळीच ना ठरें,
हालचाल अटळ शेवटी,
मनडोही कुणी टाकले खडे,--||५||

या डोहातील प्रतिमा हालती,
गूढ वाटे आकर्षण त्यांचे,
नाती गोती सारी बोलावती,
ऐहिक सुख वाटे'तोकडे,--||६||

संपून गेले ते, रेंगाळे,
चलबिचल होतां आत्म्याची, चढाओढ लागे दोघांमध्ये,
जीत होई फक्त स्मृतींची,-!!!

हिमगौरी कर्वे©



कोण जाणे कसे ठांवे,मन आज भरून आले,
आठवणींच्या आभाळात,
एकेक ढग जमा झाले,–||१||

बघता बघता एकमेकात,
ते कसे खेळू लागले,
हृदयांतरी स्मृतींचे मग,
बिलोरी आरसे हलू लागले,–||२||

स्मरणांच्या हिंदोळ्यावर,
झोके घेत झुलू लागले,
इकडून तिकडे पाय हलवत,
मन सैरावैरा धावू लागले,–||३||

गतकाळाचा जोर घेऊन,
हिंदोळा वारंवार हाले,
वरती जाता क्षणिक सुख,
भासते कधी उगीच खरे,
खाली येता त्याच सुखाचे,
दुःखात रूपांतर का बरे,–||४||

खाली असता ओढ वरची,
पाय मुळीच ना ठरें,
हालचाल अटळ शेवटी,
मनडोही कुणी टाकले खडे,–||५||

या डोहातील प्रतिमा हालती,
गूढ वाटे आकर्षण त्यांचे,
नाती गोती सारी बोलावती,
ऐहिक सुख वाटे’तोकडे,–||६||

संपून गेले ते, रेंगाळे,
चलबिचल होतां आत्म्याची, चढाओढ लागे दोघांमध्ये,
जीत होई फक्त स्मृतींची,-!!!

हिमगौरी कर्वे©

Author