No Picture
कथा

शुक्रवारची कहाणी (आजच्या काळातील)

Category:

 

आटपाट नगर होतं तिथं एक गरीब कुटुंबातील पाच जण कसे बसे दिवस काढत होते. पौरोहित्य आणि चार पाच ठिकाणी देवपूजा यातून जे मिळायचे ते समजून घेऊन आनंदात रहात होते. मोठय़ा मुलीला असेच खातेपिते घर बघून लग्न करून दिले. गावातील लोकांनी थोडा हातभार लावला होता. एक जबाबदारी आणि खायचे तोंड कमी झाले. नतंरचे दोन मुलगे सरकारी शाळेत शिकत होती. अचानक वडिलांना आजार झाला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मोठा यंदा दहावीत होता. म्हणून कशी बशी परीक्षा दिली. पास झाला. मग पौरोहित्य करु लागला पण आता पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. त्यामुळे दुकानात हिशेब लिहिण्याची नोकरी करु लागला. अशीच एक गरीब घरातील मुलगी सांगून आली. सणवार. आणि सवाष्ण म्हणून काही बाही मिळायचे याची सोय होईल म्हणून लग्न करणे आवश्यक होते ते झाले. उमा नावाप्रमाणेच सगळे काही निमूटपणे समाधानाने करत होती. आणि आता आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागातील लोक सदाशिवला पौरोहित्य करण्यासाठी बोलावू लागले होते. आणि बायकोला घेऊन या शिधा घेऊन जायला सांगत. एकदा श्रावणात सूनबाईनी पाटलांच्या घरी पुरणवरणाचा स्वयंपाक करुन पाचपंचवीस लोकांना जेऊ घालून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पाटील व पाटलोण बाई एकदम खुष. जातांना भरपूर शिधा. साडी चोळी ओटी भरली. सासूबाई म्हणाल्या तुझ्या या स्वयंपाकानेच एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चालत येईल….

No Picture
कथा

आवडीचे गैरसमज

Category:

 

बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा.

No Picture
कथा

अभिप्राय

Category:

 

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही.

No Picture
कथा

मधल्या मधे

Category:

 

आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.

No Picture
कथा

तू म्हणतीस तसंच

Category:

 

सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.

No Picture
कथा

गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

Category:

 

परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

No Picture
कथा

इस्टेट एजंट गोमु (गोमुच्या गोष्टी – भाग ५)

Category:

 

आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात. सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा केला. अशा त्या गोष्टी.

No Picture
कथा

प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

Category:

 

आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !

No Picture
कथा

कालचक्र

Category:

 

यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा. रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा. वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित. त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला. नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं .. याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल.
No Picture
कथा

रविवार बंद

Category:

 

मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. पण इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असताना त्यांच्या ग्राहकांची कायम एक तक्रार मात्र होती. ती अशी की दूध काका आपल्या या व्ययसायाइतकंच महत्व त्यांच्या परिवाराला द्यायचे. म्हणजे लोकांना त्यांच्या घरच्यांशी काही देणं घेणं नव्हतं; पण आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून काका “दर रविवारी चक्क सुट्टी घ्यायचे” ही खरी अडचण होती. काही दुकानांत ती पाटी असते ना… “रविवार बंद”. अगदी तस्स !!