“सूर “जुने”.. ध्यास नवा”
Category:
कथा साहित्य - ललित“ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”..
Category:
कथा साहित्य - ललित“ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”..
Category:
कथा साहित्य - ललितकुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं.
Category:
कथा साहित्य - ललितहातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु.
Category:
कथा साहित्य - ललितगच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “.
Category:
कथा साहित्य - ललितकाळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय…
Category:
कथा साहित्य - ललितमी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली . कुठे मित्रांच्या गप्पा , कुठे लहान मुलांचे गोंगाट , काही परिवार , वयस्कर व्यक्ती , कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही …
Category:
कथा साहित्य - ललितपरवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”
Category:
कथा साहित्य - ललितकाही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं … तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली … आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं , खेळून मळलेले कपडे , हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव … ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला.
Category:
कथा साहित्य - ललितमुंबई-गोवा हायवे वर सुसाट जाणारी एक अलिशान गाडी एका फाट्यावर आत वळते. मोठा रस्ता , मग डांबरी छोटा रस्ता, मग कच्चा रस्ता असं करत करत कोकणातल्या एका छोट्याश्या गावात शिरते आणि गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेत घेत; एका खडकाळ जागेवर येऊन थांबते …. तो चारचाकी गाडीसाठी Dead end असतो .
Category:
कथा साहित्य - ललितपरवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं . आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही . या मध्ये बरेच टप्पे आले .
Copyright © 2025 | Marathisrushti