ब्लॅक फ्रायडे
Category:
व्हिडिओज१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.
Category:
व्हिडिओज१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.
Category:
व्हिडिओजहृदयविकारावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान – नक्की ऐका..
Category:
व्हिडिओजभारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
Category:
व्हिडिओजरसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
Category:
व्हिडिओजसुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट – साखरेपेक्षा गोड – फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
Category:
लेखसंग्रह


Category:
लेखसंग्रहमराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.
Category:
लेखसंग्रहभारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti