लेखसंग्रह

परशुराम क्षेत्रातले कोकण

Category:

 

वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम.

  November 18, 2022


लेखसंग्रह

आखिर क्यूँ?

Category:

 

” वीर-जारा ” मध्ये शाहरुख खान किरण खेरला म्हणतो- “माहित नाही, माझ्या आणि तुमच्या देशातील मुले सारखीच असतात का ते? पण एवढं मात्र खात्रीने सांगू शकतो – आई इथून-तिथून सारखीच असते.”

  November 18, 2022


लेखसंग्रह

कागदी चलनाचा इतिहास

Category:

 

सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या.

  November 17, 2022


कथा

व्यवहार

Category:

 

पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते .

  November 17, 2022


लेखसंग्रह

सरती, सहज, स्वाभाविक मावळती

Category:

 

मोठ्यामोठ्याने आरती,सोबत शंखनाद तरीही एक सदगृहस्थ विचलित न होता शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. भोवतीच्या गल्बल्यापासून अलिप्त ! अपरिहार्य मावळतीचा मोठा धडा त्यांच्याकडून मला मिळाला.

  November 17, 2022


साहित्य - ललित

माणसं जोडणारा गणेशोत्सव

Category:

 

बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या.

  November 17, 2022


साहित्य - ललित

कल्पनाची ‘आयडिया!’

Category:

 

कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या समाधानातच स्वतःचा आनंद मानणारे होते. कल्पनाला किशोरने पसंत केले. रितीरिवाजानुसार लग्नकार्य पार पडले. चौघे आनंदाने राहू लागले. वर्षातील सणवार परंपरेनुसार पार पडले. काही दिवसांनी नव्याची नवलाई संपुष्टात आली आणि घरातील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही. कामापुरतंच एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. कल्पना हुशार होती. तिनं एका रविवारी किराणा दुकानातून एक छोटं रिकामं खोकं आणलं. त्यावर रंगीत कागद चिकटवून ते पॅकबंद केलं. त्याच्या वरच्या बाजूला एक काॅईन बाॅक्ससारखी दोन इंचाची चीर पाडून ठेवली.

  November 17, 2022