एक परीस स्पर्श (भाग – ५६)
Category:
कथा साहित्य - ललितविजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..
September 3, 2022