नक्षत्रांची वेल
Category:
साहित्य - ललितनेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .
आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .