No Picture
साहित्य - ललित

दिगू टिपणीस

Category:

 

मुख्यमंत्री जीवाजीराव शिंदे हे मंत्री मंडळाचा केलेला विस्तार पत्रकार परिषदेत सांगू लागतात, तेव्हा पत्रकार दिगू टिपणीसला मानसिक धक्का बसतो. त्याने केलेल्या कल्पनेच्या पलीकडचे प्रत्यक्षात घडताना पाहून तो तिरीमिरीत उठतो व मंत्रालयाच्या बाहेर पडतो.. रस्त्यावरील एक भिकारी त्याच्या समोर येऊन हात पसरतो.. दिगू भिकाऱ्याकडे एकटक पाहता पाहता हसू लागतो.. भिकारीही त्याच्या हसण्यात सामील होतो… आणि ‘समाप्त’ ची पाटी पडद्यावर झळकते..

No Picture
साहित्य - ललित

नाती ‘रस’वंती

Category:

 

नाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात..

No Picture
कथा

संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

Category:

 

गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं.

No Picture
साहित्य - ललित

प्लॅन्ड सीझर

Category:

 

मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला.

No Picture
साहित्य - ललित

भिकारी

Category:

 

मध्यंतरी वर्तमानपत्रात बालाजी देवस्थान येथील एका भिकाऱ्याची बातमी आली होती. हा भिकारी बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मागे लागून त्यांना पैसे मागायचा. अशी त्यानं अनेक वर्षे भीक मागून जिंदगी घालवली. नुकताच त्याचा मृत्यू झाल्यावर पोलीसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली, तेव्हा लाखो रुपयांची रोकड त्यांना मिळाली. एवढे रुपये जवळ असताना, त्याला भीक मागणे सोडून द्यावे, असं कदापिही वाटलं नाही… कारण, काहीही कष्ट न करता, पैसे मिळविण्याचे त्याला जडलेलं ‘व्यसन’!!

No Picture
साहित्य - ललित

ख’वट सावित्री

Category:

 

वर्षातून एकदाच येणारा, माझा ‘वट पौर्णिमेचा सण’ या तमाम मराठी मालिकावाल्यांनी, त्यांच्या कथानकातील ‘कट कारस्थानां’नी उधळून लावलाय.. पूर्वी साधंसुधं ‘दूरदर्शन’ असताना वट सावित्रीच्या व्रत वैकल्याचे, या दिवशी गोडवे गायले जायचे. या दिवसाचं निमित्त साधून वट पौर्णिमेचं एखादं गाणं किंवा प्रसंग असलेला मराठी चित्रपट आवर्जून दाखवले जायचे. त्याकाळातील सुलोचना, आशा काळे, इंदुमती पैंगणकर, उमा भेंडे, अलका कुबल, इ. सोज्वळ नायिका, मला प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत, भक्तीभावाने सुमधुर गाणी म्हणायच्या..मला अगदी कृतकृत्य वाटायचं..

No Picture
साहित्य - ललित

जब्बार’दस्त

Category:

 

शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात बी. जे. मेडिकल मध्ये घेतले. त्याच दरम्यान विजय तेंडुलकरांशी त्यांची भेट झाली. नाट्यस्पर्धांसाठी त्यांनी तेंडुलकरांची नाटके बसवली. विजय तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक जब्बार यांना दिल्यानंतर त्यांच्या ‘मिडास टच’ने ते अजरामर झाले. या वादग्रस्त नाटकाने देशात हजारो व परदेशात शेकडो प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ केले.

No Picture
साहित्य - ललित

इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर

Category:

 

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणजेच ई टी ओ ही रँक पूर्वी इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा ई ओ अशी होती. हल्ली नवीन जहाजांवर आधुनिकीकरणामुळे ऑटोमेशन, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड सिस्टीम आल्यामुळे इलेक्ट्रिकल ऑफिसर्स ना सुद्धा सक्षमता परीक्षा किंवा कॉम्पेटँसी एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा सुरु झाल्यापासून इलेक्ट्रिकल ऑफिसर हे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून जहाजावर जॉईन होत आहेत.

No Picture
साहित्य - ललित

जगावेगळं जोडपं

Category:

 

नचिकेत व जयू हे दोघेही खरे व्यवसायाने आर्किटेक्चर. मात्र ही क्रांतिकारी घटना पडद्यावर साकारण्यासाठी त्यांनी चंग बांधला. NFDC कडून अर्थसहाय्य घेऊन अवघ्या साडे तीन लाखांत या चित्रपटाची निर्मिती केली. थिएटर अॅकॅडमीचं या निर्मितीला सहकार्य मिळालं. माझ्या ओळखीचे अनेक कलाकार या चित्रपटात सहभागी होते.

No Picture
साहित्य - ललित

मधु’रिमा’

Category:

 

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटापासून तिने सिने कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर नाटक आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात तिचे नाव गाजू लागले.