ठिणगी
Category:
साहित्य - ललितशेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची.