No Picture
कथा

नवरात्र …माळ तिसरी

Category:

 

रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय …. जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत … तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं … कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..

No Picture
कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १९

Category:

 

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

No Picture
कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १७

Category:

 

माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू.

No Picture
कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १८

Category:

 

त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली.

No Picture
कथा

नवरात्र …पहिली माळ !

Category:

 

आमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे … कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत … मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे .

माणसं जोडणारी , आमच्या घरदाराला एकत्र बांधणारी , हौसेने वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालणारी .. आमची आजी ! तिला तिचा भाऊ अभिमानाने गौरी म्हणे . कारण तिचं सुंदर रुप …उंच शेलाटा बांधा , गौरवर्ण , हसरा चेहरा , मोठया केसांची वेणी .. त्यावर माळलेले अनंताचे फुल .. अगदी रोज हं … रोज पहाटे आन्हिकं आवरून घरामागच्या बागेत जाउन फुलं गोळा करायची आणि देवपूजा झाली की आपणही एक फुल हौशीने माळायचं ..आणि मुलींना सुनेला ही घालायला लावायचं .. फुलांची दांडगी हौस , ही तिच्याकडून आईकडे आणि नंतर माझ्या कडे अशी झिरपत आलीये … गाण्याचा कान …गाणं म्हणायची हौस , वाचनाची आवड ….

No Picture
साहित्य - ललित

युरोपायण – तिसरा दिवस – पँरीस- स्पर्श

Category:

 

हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो.

No Picture
कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १६

Category:

 

आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.

No Picture
कथा

अजब न्याय नियतीचा – भाग १५

Category:

 

सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्‍यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.

No Picture
साहित्य - ललित

युरोपायण – दुसरा दिवस – लंडन

Category:

 

कालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा वाढवणे असा प्रकार कुठेच दिसला नाही