Month: September 2019
अजब न्याय नियतीचा – भाग १७
Category:
कथा साहित्य - ललितमाझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू.
अजब न्याय नियतीचा – भाग १८
Category:
कथा साहित्य - ललितत्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली.
नवरात्र …पहिली माळ !
Category:
कथा साहित्य - ललितआमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे … कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत … मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे .
माणसं जोडणारी , आमच्या घरदाराला एकत्र बांधणारी , हौसेने वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालणारी .. आमची आजी ! तिला तिचा भाऊ अभिमानाने गौरी म्हणे . कारण तिचं सुंदर रुप …उंच शेलाटा बांधा , गौरवर्ण , हसरा चेहरा , मोठया केसांची वेणी .. त्यावर माळलेले अनंताचे फुल .. अगदी रोज हं … रोज पहाटे आन्हिकं आवरून घरामागच्या बागेत जाउन फुलं गोळा करायची आणि देवपूजा झाली की आपणही एक फुल हौशीने माळायचं ..आणि मुलींना सुनेला ही घालायला लावायचं .. फुलांची दांडगी हौस , ही तिच्याकडून आईकडे आणि नंतर माझ्या कडे अशी झिरपत आलीये … गाण्याचा कान …गाणं म्हणायची हौस , वाचनाची आवड ….
युरोपायण – तिसरा दिवस – पँरीस- स्पर्श
Category:
साहित्य - ललितहीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो.
अजब न्याय नियतीचा – भाग १६
Category:
कथा साहित्य - ललितआरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.
अजब न्याय नियतीचा – भाग १५
Category:
कथा साहित्य - ललितसगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.
युरोपायण – दुसरा दिवस – लंडन
Category:
साहित्य - ललितकालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा वाढवणे असा प्रकार कुठेच दिसला नाही
अजब न्याय नियतीचा – भाग १३
Category:
कथा साहित्य - ललितदी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती.
अजब न्याय नियतीचा – भाग १४
Category:
कथा साहित्य - ललितदुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.