No Picture
लेखसंग्रह

श्रीकृष्ण जन्माष्टमी-आशय व महत्व

Category:

 

‘जन्माष्टमी”’ म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

No Picture
साहित्य - ललित

युरोपायण – पहिला दिवस

Category:

 

मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला.

No Picture
साहित्य - ललित

पाठलाग एका स्वप्नाचा !

Category:

 

समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच  पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता. 

No Picture
साहित्य - ललित

मी गांधारी

Category:

 

आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड!

या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर पसरून ठेवतो अन मध्यभागी फतकल मारून बसतो! एक एक चित्र त्याची जन्म कथा ऐकवते. हे समोरच निष्पर्ण वृक्षाचे चित्र पाहून, जे. डी. म्हणाला होता, ‘तू हे अशी बोडखी झाड का काढतोस ?’ हल्ली जे. डीचा संपर्क कमी झालाय. फोन केला पहिजे. समोरचे खडकाचे चित्र, माझे सध्याचे फेवरेट, जमता जमेना, खूप कागद,वेळ ,रंग, मेहनत वाया गेली. हवा तो दगडाचा पोत साधत नव्हता. रागा, रागा कागदाचा वेडा -वाकडा बोळा केला, बशीतल्या काळ्या शाईत बुचकळला,अन drawing पेपरवर करकचून दाबला, सुकल्यावर फाईन tuning केल, शेजारी एक वाळक झाड काढल. मस्त इफेक्ट साधला.!

 

No Picture
साहित्य - ललित

दाम्या !

Category:

 

दाम्याच्या उल्लेखा शिवाय माझे अन त्याचे बालपण पूर्ण होणार नाही. दाम्या माझ्या पाचवीला पुजलेला! म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र, ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत.तो सातवीत, मी एस. एस. सी. होईपर्यंत थांबला. मी कॉलेज साठी आणि त्याने बाह्य जगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली.

No Picture
साहित्य - ललित

अब्दुल !

Category:

 

अब्दुल, असाच एका ‘सजी-सवरी ‘ रिक्षाचा चालक. कळकट चौकटीघराची लुंगी, मळका पांढरासदरा, वेडी-वाकडी वाढलेली, विरळ काळ्या -पांढऱ्या केसांची टोकदार दाढी, बंडाच्या पायित्र्यातले करडे-वरडे डोईवर केस, त्यांना पाय बंध घालण्यासाठी कपाळा लाबांधलेलं लाल/हिरव फडकं! असलं पाच साडेपाच फुटी काटकुळ ध्यान! उन्हानं रापलेल्या चेहऱ्यावर गरिबी म्हणावे कि लाचारी असले भाव!

No Picture
साहित्य - ललित

बायको आणि मैत्रिण

Category:

 

दोन घट्ट वेण्या घालून, सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘, अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. ‘ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा’ म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी, ‘चल निमे आपण सायकल खेळू, मी, शिकवतो तुला’, म्हणलं तरी, ‘नको आई रागावते अन मला काम पण आहे.’ म्हणून येण्याचे टाळते. शाळा सुटल्यावर, गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत, धूम घरा कडे पळणारी ‘निमा’, आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून, ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते. काहीतरी तिच्यात बदलेले असत. पण काय? ते लक्षात येत नाही.