No Picture
शहरे आणि गावे

रुवांडा

Category:

 

रुवांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. रवांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला काँगो हे देश आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

टांझानिया

Category:

 

टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पूर्व तिमोर

Category:

 

पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो.

No Picture
शहरे आणि गावे

तैवान

Category:

 

चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.

No Picture
शहरे आणि गावे

ताजिकिस्तान

Category:

 

ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

त्रिनिदाद आणि टोबॅगो

Category:

 

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.

No Picture
शहरे आणि गावे

ट्युनिसिया

Category:

 

ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

तुर्कस्तान, तुर्की किंवा टर्की

Category:

 

तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. ‘तुर्क’ याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.

No Picture
शहरे आणि गावे

तुर्कमेनिस्तान

Category:

 

तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

आइसलंड

Category:

 

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.