No Picture
साहित्य - ललित

वश्याच ‘ क्युट ‘ लफड

Category:

 

आता येथे वश्याचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. (जेसे जसे तुम्ही आमच्या सोबत रहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच ! ) याचे नाव वसंत जोशी . आम्ही याला वश्याच म्हणतो. (आणि म्हणत राहणार . तो त्याच लायकीचा आहे ! ) तो भरमसाट किमतीचे कळकट कपडे घालतो. कारण तो स्वतःला आधुनिक (त्याच्या भाषेत मॉड !) समजतो. ठीगळाचे शर्ट , मुंडीछाट टी-शर्ट ,फाटक्या , विटक्या रंगाच्या जीनच्या पॅंटी , त्याच्या भाषेत ‘कूल ‘असतात ! आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा ‘कंट्री’समजतो . आमच्या वश्याचे (आता मित्रच कि, मग त्याला परका तरी कस म्हणायचं? ) दोन वीक पॉईंट आहेत . एक हा मोबाईल आणि ….. बाईल ! म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा …. आहे . हा कुठेही, कोणाच्याही , अन कसाही तो प्रेमात पडू शकतो ! (आज पर्यंत तो खूपदा पडलाय ! काही वेळेला गुडघे ,कोपर सडकून निघालेत ! पण गडी ऐकत नाही !) कोणती हि ‘ती ‘ त्याला ‘क्युट’च दिसते ! याबाबतीत तो काळ ,वेळ , वय (त्याचे आणि तिचेही !), प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो .

No Picture
साहित्य - ललित

शाप !

Category:

 

पुन्हा, पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो !

No Picture
कथा

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

Category:

 

“याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे त्याला खटकलं होतं. त्यांने गोड बोलून पप्पांकडून पर्सनल सिक्यूरिटी पेपर्स वर सह्या घेतली व तो पैसे खाऊन परागंदा झाला. पप्पांकडून बॅंकेने पैसे वसूल करून घेतले. पप्पाना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशावेळी सिक्वेरा साहेबांनी मला मदत केली. त्यांचं सर्व कर्ज फेडलं.”

” त्याची उतराई करण्याकरता तूं सिक्वेरा साहेबांशी लग्न केलंस, होय नां ?” सुरेशचा प्रश्न.
“सिक्वेरा साहेबांना एक मुलगा होता. विल्यम्स सिक्वेरा. तो कँंसरने आजारी होता. त्याच्या आईने- सिक्वेरा साहेबांच्या दिवंगत पत्नीने विल्यमचं लग्न करून देण्याची जबाबदारी सिक्वेरा साहेंबावर टाकली. शिवाय त्यांच्या वाटेची प्रॉपर्टी भावी सुनेच्या नांवाने करण्याची अट घातली. त्यांच्या निधनानंतर सिक्वेरा साहेबांना मला विचारल. मी होकार दिला. विल्यम्स शी माझं लग्न झालं. त्यानंतर दोनच महिन्यानंतर तो वारला. सिक्वेरा साहेब अलीकडेच वारले. त्यांची प्रॉपर्टीही माझ्या नांवाने झाली…..”

No Picture
साहित्य - ललित

पोळी का करपली ? वेताळ कथा

Category:

 

पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा  ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले .

No Picture
साहित्य - ललित

तिरसट म्हातारा

Category:

 

नाना झिपरेनी आपला हट्ट सोडला नाही . त्याने पुन्हा झाडावर लटकणाऱ्या प्रेतास खांद्यावर घेतले  व स्मशाना कडे निघाला ! नेहमी प्रमाणे वेताळ प्रेतात प्रवेश करून बोलू लागला .

No Picture
कथा

एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

Category:

 

सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”