अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन
Category:
शहरे आणि गावेअमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.