छोटीसी बात……. मित्र पालक
Category:
साहित्य - ललितरात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच. प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं. समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे पाहून बोललं पाहिजे. अशावेळी आईची चिडचिड होते.