दोन मनें दे प्रभू

इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची
ऐकून घे कहाणी, अडचणींची ।।

नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने
सार्थक होईल तेव्हां तप:साधने ।।

संसार पाठी, लावलास तूं
गुरफटून त्यांत, साध्य न होई हेतू ।।

मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर
एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार ।।

दे प्रभू ,मनाची एक जोडी
संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची
ऐकून घे कहाणी, अडचणींची ।।

नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने
सार्थक होईल तेव्हां तप:साधने ।।

संसार पाठी, लावलास तूं
गुरफटून त्यांत, साध्य न होई हेतू ।।

मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर
एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार ।।

दे प्रभू ,मनाची एक जोडी
संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author