प्रल्हाद!
Category:
साहित्य - ललित‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
Category:
साहित्य - ललित‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
Category:
कथा साहित्य - ललित” कुठे आहेस आत्ता ? ”
” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”
” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”
” काळजीने की प्रेमाने ? ”
” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .
” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .
Category:
कथा साहित्य - ललित” मी लग्न जमवले आहे म्हणून त्यावेळी तुम्हांला सगळ्यांना घरी पार्टी दिली होती . तेंव्हा आपण सगळे आपल्या येई वो विठ्ठले नाटका बद्दल बोलत होतो . त्यावेळी तुझ्या शेजारच्या खुर्चीत बसत असताना फक्त तुला ऐकू जाईल अशा पध्दतीने माझी आई तूला काय म्हणाली होती हे मीही विसरलेले नाही . आणि तूही बिलकूल विसरलेला नाहीस , अगदी तू कधीच , कोणाकडेही त्याची वाच्यता केलेली नसलीस तरी , हेही मला चांगले माहीत आहे . ”
” मी तर ते तुलाही कधीच सांगितले नाही . आपण त्यानंतर इतके वेळा , इतक्या विषयांवर बोलत असतो तरीसुद्धा . त्यामुळे तुला हे कसे माहीत ? ”
” मी आईच्या मागेच होते . आणि मी तशी उभी आहे हे पाहूनच आई तेंव्हा तसं म्हणाली . काळाच्या ओघात माझी निवड आई ने मनापासून स्वीकारली तरी तिची माझ्या साठीची निवड नेहमीच . . . . . ”
” आता त्या हयात नसताना आणि आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या विषयी असं म्हणणं हे योग्य नाही “
Category:
कथा साहित्य - ललितअसे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! ” ” तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन
Category:
कथा साहित्य - ललितमी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली . पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू . मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे . आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call . कारण तुला skype download करायचा कंटाळा . ” जमलय ” अशी तुझी दिलखुलास दाद . . .आणि मग तू प्रत्यक्षात म्हणायच्या आधीच माझ्या काना – मनात घुमनार तुझे वाक्य . . . जवळ असतीस तर . . . ” हे वाक्य नाही रे पाठ सोडत . . .
Category:
कथा साहित्य - ललितवेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता.
Category:
कथा साहित्य - ललितशाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित – अनियमितपणे होणारी गेट – टुगेदर हा दिलासा असतो , हुरहुर असते की अंतर्शोध – अंतर्नादाला निमंत्रण असते ? हा प्रश्न अलीकडे फार वेळा पडतो मला ….
तू गेट -टुगेदरला असलास तरी आणि नसलास तरीही …
Category:
कथा साहित्य - ललितमी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .
कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .
…हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !
Category:
कथा साहित्य - ललितनाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल.
Category:
कथा साहित्य - ललितआपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.
Copyright © 2025 | Marathisrushti