No Picture
साहित्य - ललित

लोकधाराची दंगलगाणी

Category:

 

महाराष्ट्राची लोकधारा’चा पहिला कार्यक्रम मी पाहिला, तो चारुदत्त आफळेने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेला. त्या कार्यक्रमात प्रवीण सूर्यवंशी नावाचा एक उत्साही कलाकार, वासुदेवाची भूमिका करायचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्याशी आमचा परिचय झाला.

No Picture
साहित्य - ललित

सुरीली’ सफर

Category:

 

गुणगौरव’मध्ये जाहिरातींची कामं सुरु करण्याआधी आम्ही घरातूनच कामं करीत होतो. ऑर्केस्ट्राचं पहिलं काम केलं ते पपीशकुमार ललगुणकर यांच्या तिकीटाच्या डिझाईनचं. हत्ती गणपतीजवळ एक छोटा ‘लकी प्रिंटींग प्रेस’ होता. शहा व लाळे असे दोघेजण त्याचे पार्टनर होते. त्यांच्याकडे डिझाईनचं काही काम आलं की, ते आमच्याकडून करुन घ्यायचे.

No Picture
साहित्य - ललित

साकव

Category:

 

१९९० च्या सुमारास एक पंधरा सोळा वर्षांचा खेडवळ तरुण मुलगा आमच्या ऑफिसमध्ये आला. त्याला ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णीने डिझाईसाठी, आमचा पत्ता दिला होता. अत्यंत साध्या कपड्यामधील त्याला पाहून, हा कोणत्या कामासाठी आपल्याकडे आला असेल? याचा विचार मी करु लागलो.

No Picture
साहित्य - ललित

“मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला”

Category:

 

मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं आॅफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं.

No Picture
साहित्य - ललित

गोळी

Category:

 

लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. ‘तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन’ असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो.

No Picture
साहित्य - ललित

पोस्ट-कार्ड

Category:

 

मी क्षणार्धात भूतकाळात गेलो. १९८३ साली अनेक दिवाळी अंकांचे काम केले होते. त्यामुळे पोस्टमनची घरी रोजचीच चक्कर होत असे. कधी पत्रं तर कधी दिवाळी अंकाचे पार्सल पोस्टाने येई. त्या दिवाळीला आलेल्या दोघां पोस्टमनच्या हातावर ‘पोस्त’ची रक्कम देताना मला अतिशय समाधान वाटलं होतं आणि या वर्षी कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने मी लाॅकडाऊनमध्ये घरात बसून काढले.

No Picture
साहित्य - ललित

वडापाव

Category:

 

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘परमेश्वराला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्याच रुपाने घ्यावा लागेल!’ आता ऐंशी वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे, आता भाकरी ही भुकेल्याला जीवनावश्यक असली तरी तिची जागा आता ‘वडापाव’ने बळकावली आहे.

No Picture
साहित्य - ललित

इस्त्री’ ची घडी

Category:

 

पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी.

No Picture
साहित्य - ललित

हां बाबू, ये ‘सर्कस’ है

Category:

 

भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले.

No Picture
साहित्य - ललित

देवदूत दिन

Category:

 

पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले.