इजिप्त
Category:
शहरे आणि गावेइजिप्त हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.
Category:
शहरे आणि गावेइजिप्त हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.
Category:
शहरे आणि गावेब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
Category:
शहरे आणि गावेसाक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.
Category:
शहरे आणि गावेबुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempडोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर. ठाणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. मात्र डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य असे की हे शहर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आ
Category:
शहरे आणि गावेबहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक व हैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेबांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
Category:
शहरे आणि गावेझिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.
Category:
शहरे आणि गावेबेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती एकवटलेल्या बेनिनची राजधानी पोर्तो-नोव्हो असून कोतोनू हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेयूनान हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीस मध्ये हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti