गानसरस्वती किशोरी आमोणकर – आदिशक्तीचा धन्योद्गार!
व्हिडिओज

गानसरस्वती किशोरी आमोणकर – आदिशक्तीचा धन्योद्गार!

Category:

 

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.

ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर
व्हिडिओज

ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर

Category:

 

मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

त्यांच्या जाण्याने पारंपरिक संगीत रंगभूमी आणि नव्या विचार-आशयांची संगीत रंगभूमी यांना जोडणारा दुवा निखळला आहे.
2012 साली महाराष्ट्र राज्य शासनाने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. त्यावेळी त्यांच्या गौरवपर सादर झालेल्या चित्रफितीद्वारे त्यांच्या कार्याला वंदन करूया.

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान
व्हिडिओज

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान

Category:

 

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान अनंतात विलीन झाले. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया

पंडित रामनारायण चित्रफित
व्हिडिओज

पंडित रामनारायण चित्रफित

Category:

 

पंडित राम नारायण म्हणजेच सारंगी आणि सारंगी म्हणजेच पंडित राम नारायण इतकं अद्वैत या दोघांमध्ये निर्माण झालं होतं. ज्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब यांच्या जाण्याने शहनाई पोरकी झाली, त्याचप्रमाणे पंडित रामनारायण यांच्या जाण्याने आज सारंगी पोरगी झाली आहे.

रंगश्रीमंत विद्याधर गोखले
व्हिडिओज

रंगश्रीमंत विद्याधर गोखले

Category:

 

मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.

रंगश्रीमंत व्याख्यानमाला – कलावंत आणि त्याची प्रतिभा
व्हिडिओज

रंगश्रीमंत व्याख्यानमाला – कलावंत आणि त्याची प्रतिभा

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे व्याख्यान म्हणजे विचारांचा एक महाप्रवाह…. मूळ विषय मांडताना, त्या अनुषंगाने इतरही अनेक गोष्टींवर त्यांचे चिंतन प्रगट होत असते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पुण्यस्मरण करताना कलावंत आणि त्याची प्रतिभा याविषयीचे मुक्त चिंतन त्यांनी केले. ते मौलिक विचार आजच्या भागात ऐकूया….

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २
व्हिडिओज

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २

Category:

 

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. ‘कट्यार’मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच.

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग १
व्हिडिओज

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग १

Category:

 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिन.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो,-चित्रफित
व्हिडिओज

फादर फ्रान्सिस दिब्रिटो,-चित्रफित

Category:

 

भारतीय संस्कृतीशी समरस झालेले ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्य शासनाने फादरना शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग २
व्हिडिओज

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग २

Category:

 

आज गुरुपौर्णिमा ! ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया