रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेभात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.