No Picture
साहित्य - ललित

बर्थ – रिबर्थ

Category:

 

डिलीव्हरी नंतर अडीच तीन तास झाले असावेत प्रियाकडे बघून तिच्या मामीला काहीतरी वेगळेच जाणवले. प्रियाला काहीतरी होतेय असे तिला वाटले, हा डिलीव्हरी नंतरचा थकवा नाहीये असे तिला वाटतं असताना तिने सिस्टरला बोलावले आणि प्रियाला बघायला सांगितले तेवढ्याने पण तिचे समाधान झाले नाही. मामीने डिलिव्हरी केली त्या डॉक्टरना ताबडतोब बोलवायला सांगितले. डॉक्टर आल्यावर त्यांनी प्रियाला बघितले आणि लगेच पुन्हा ओटी मध्ये न्यायला सांगितले. नॉर्मल डिलिव्हरी नंतर अडीच तीन तासांनी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता.

No Picture
साहित्य - ललित

ब्रँडेड स्कुल

Category:

 

सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या.

No Picture
साहित्य - ललित

हळदीला ठेवलेला आर्केस्ट्रा

Category:

 

हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले.

No Picture
साहित्य - ललित

प्रेरणा

Category:

 

गावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले होते. वरच्या तीन मजल्यावर प्रत्येकी चार याप्रमाणे बारा ब्लॉक पैकी साठ चाळीस च्या हिशोबात पाच ब्लॉक मिळाले त्यापैकी, एका अक्खा मजल्यावर स्वतःला राहण्यासाठी चार ब्लॉक एकत्र करूनही गावातल्या जुन्या घरापेक्षा कमी जागा मिळाली.

No Picture
साहित्य - ललित

हुक्का पार्लर

Category:

 

नाम्या शेट बाहेरून लॉक लावलेल्या खोलीच्या दरवाजाला असलेल्या ग्रील पलीकडे बोंबलणाऱ्या स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाकडे असहायपणे बघत होता. त्याच्याकडे बघता बघता त्याला हुंदका अनावर झाला.

No Picture
साहित्य - ललित

मोठे देव, छोटे देव

Category:

 

देवांच्या बैठकीला देशभरातील मोठं मोठ्या देवस्थानचे सगळे देव उपस्थित होते. त्यांच्यासह इतर लहान मोठ्या शहरांसह खेडेपाड्यातील लहान मोठी मंदिरातील तसेच गरीब श्रीमंत आणि सर्वसामान्य लोकांच्या देवघरातील देव सुद्धा हजर होते.

No Picture
साहित्य - ललित

ठाकूर मॅडम

Category:

 

बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते.

No Picture
साहित्य - ललित

चिचा

Category:

 

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.

No Picture
साहित्य - ललित

करवंदे अलिबागची

Category:

 

शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची.

No Picture
साहित्य - ललित

अटॅचमेन्ट

Category:

 

लहानपणी मांडव्याला गेल्यावर मांडवा ते रेवस रस्त्यावर सारळ पूला पर्यंत सायकल घेऊन फिरायला खूप मजा यायची. मांडवा जेट्टी आणि किनाऱ्यावर सायकल घेऊन तासन तास फिरताना कोणीच अडवायचे नाही. रस्त्यावर तेव्हा फारशी रहदारी नसल्याने सायकल दोन्ही हात सोडून चालवणे, उतरण असलेल्या रस्त्यावर हॅन्डलवर हाता ऐवजी दोन्ही पाय ठेवून चालवणे अशा करामती केल्या जायच्या.