No Picture
साहित्य - ललित

कंटोळी

Category:

 

कंटोळी हा प्रकारच एवढा आकर्षक आहे की ती भाजी बघता क्षणी लक्ष वेधून घेते. डार्क किंवा लाईट पोपटी आणि हिरवा रंग. पातळ आणि लांब सडक देठ, एखाद्या खात्या पित्या घरच्या व्यक्तीच्या सुटलेल्या पोटासारखा गोल गरगरीत आकार आणि त्यावर असणारे संपूर्ण मऊ टोकदार काटे.

No Picture
साहित्य - ललित

दिव्यांग विठ्ठल अण्णा

Category:

 

मागील आठ वर्षांतील दिव्यांग निधीचा दोन कोटी उत्पन्नाच्या प्रमाणात मागील तीन वर्षांत 5% आणि पाच वर्षांतील 3% प्रमाणे साठ लाख रुपयांचा हिशोब द्या, नाहीतर गावातील वीस दिव्यांगांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन तीन लाख जमा करा. अन्यथा साठ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी शिक्षा भोगायची तयारी ठेवा असे ठणकावून अण्णा बाहेर पडले.

No Picture
साहित्य - ललित

ठाणे ते कल्याण

Category:

 

तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.

No Picture
कथा

आक्करमाशा

Category:

 

ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले.
त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे.
त्याच्या आईशी त्याचा मामा आणि आजोबा कधी बोलल्याचे त्याने बघितलेच नाही. रंज्यावर फक्त दोन व्यक्तींचीच माया एक त्याच्या आईची आणि दुसरी त्याच्या आईच्या आईची. त्याच्या आजी मुळे त्याच्या आईला आणि त्याला डोक्यावर छप्पर आणि दोनवेळचे खायला मिळत होते. त्याच्या आजोबांनी आणि मामाने रंज्याच्या आईला ती गरोदर असताना देखील घरात आसरा दिला नव्हता आजीने खुप विनवण्या केल्या तेव्हा कुठे तिला वाड्यातल्या जनावरांच्या गोठ्याला लागून असलेल्या लाकूडफाट्याच्या खोलीत राहायची परवानगी दिली.
No Picture
साहित्य - ललित

सी प्रिन्सेस

Category:

 

बलास्ट पंप सुरू होऊन बलास्ट टँक मधील पाणी उपसणे सुरु झाले. तडतड तुटण्याचा जोराचा आवाज झाल्याचे सगळ्यांनी ऐकले. आवाज कुठून आणि कसा काय आला अशा प्रश्नार्थक नजरेने जो तो एकमेकांकडे पाहू लागला. तेवढ्यात सेकंड ऑफिसर ने पब्लिक अड्रेस सिस्टीम वर मोठ्याने घाईघाईत अनाउन्समेंट केली जहाज मिड शिप मध्ये तुटले आहे.

No Picture
साहित्य - ललित

इन्सीनरेटर

Category:

 

जहाजावर इन्सीनरेटर नावाचे एक युनिट असतं. यामध्ये एक अशी मशीनरी असते ज्यामध्ये जहाजावरील वेस्ट ऑईल जाळले जाते.

No Picture
साहित्य - ललित

स्वीचबोर्ड

Category:

 

जेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण.

No Picture
साहित्य - ललित

किंडर जॉय

Category:

 

अरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट.

No Picture
साहित्य - ललित

सेलर्स डॉटर

Category:

 

जहाजावरुन परतल्यावर पुढील नऊ महिने उलटून गेले तरी मला पुन्हा जहाजावर जॉइन करायची इच्छाच होत नव्हती. मुलगी चालायला लागली होती, इवल्याशा नाजूक बोटांनी मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करून फोटो बघणे, हसणे आणि खिदळणे आणि घरात पहिलीच मुलगी आणि एकटी सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांकडून नुसतं लाड आणि कौतुक चालू असायचे , तिच्या जन्मापासून तेव्हाही आणि आजही घर आनंदाने अक्षरशः ओसंडून वाहत आहे.