No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – लेखांक ८ वा – पूर्वा भाद्रपदा नक्षत्र

Category:

 

रंग चिकित्सेत पूर्वाभाद्रपदा या नक्षत्र विषयी आपण माहिती घेऊ. नक्षत्र मालेतील २५ वीनक्षत्र जागा पूर्वाभाद्रपदा ची आहे. या नक्षत्राचे आकाशात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रात्री नऊ ते अकरा या वेळेत दर्शन होते. डोक्यावर दिसते आपल्या या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ राशीत आहेत तर पुढील एक चरण मीन राशीत आहे. म्हणजे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींसाठी शीतरंग योजलेले आहेत.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – लेखांक ७ वा – हस्त नक्षत्र

Category:

 

रंग चिकित्सेत या लेखात आपण हस्त नक्षत्रा बाबत माहिती घेऊ. नक्षत्रांच्या क्रमवारीत हस्त हे तेरावे नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता सूर्य सविता आहे. या नक्षत्रात पाच तारे असून त्यांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे चारही चरण कन्या राशीत येतात. कन्या रास ही शीतरंगांच्या प्रभावाखाली येते. उदयापूर्वीचा सूर्य आणि आता जवळ आलेला सूर्य ज्या स्वरूपात दिसतो, त्या रूपाला सविता असे म्हंटलेलं आहे. सविता एक स्वतंत्र देवता आहे. सविता म्हणजे प्रेरणा, उत्साह उद्दीपित करणे असे अर्थ आहेत. सायणाचार्यांनी सांगितले आहे की, सविता सोनेरी हाताचा, सोनेरी डोळ्याचा अन सोनेरी जिभेचा आहे. तो जीवमात्रांचे पापे दुःखे दूर करतो तसेच मानवाची दुःखे सोडवून आयुष्य वाढवितो. म्हणून या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी सकाळच्या कोवळ्या उन्हात विशेषतः पिवळ्या रंगाच्या, फिक्कट पिवळ्या वा ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान करून बसावे.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – मृगशीर्ष नक्षत्र

Category:

 

सत्तावीस नक्षत्रांच्या मालिकेत पाचव्या क्रमांकावर हे नक्षत्र येते. राशींचा विचार केल्यास वृषभ आणि मिथुन राशींच्या व्यक्तींचा जन्माच्या वेळी, पहिल्या २ चरणासाठीवृषभ आणि नंतरच्या दोन चरणांसाठी मिथुन राशी आहे. कष्ट आणि शृंगार वा मौजमजा करणाऱ्या अशा दोन स्वभावाचे व्यक्तींचा राशींसाठी मृग नक्षत्राची योजना आहे. शीतरंग म्हणजे निळा, जांभळा, हिरवा, हिरवट जांभळा, पिवळट हिरवा, पोपटी या रंगांचा सकारात्मक प्रभाव या नक्षत्रावर पडतो. या नक्षत्रावरच पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर जलतत्वाचाच प्रभाव अधिक असतो.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा लेखांक 5 पूर्वाषाढा नक्षत्र

Category:

 

मागील लेखात आपण अश्विनी नक्षत्राचा त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती वर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. या लेखात आपण पूर्वाषाढा या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कोणते रंग या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीने वर्ज्य करावयास हवेत म्हणजे टाळायला हवेत वगैरे माहिती जाणून घेऊ.

नक्षत्र मालिकेतील विसाव्या क्रमांकाला हे नक्षत्र आहे. विसावा या शब्दाच्या उच्चारांमध्ये आपल्याला आशय गवसतो. विसावा याचा अर्थ एकोणीस नंतर येणारा अंक विसावा असा जरी असला तरी विसावा म्हणजे विश्रांती आराम तसेच मोठ्या प्रवासात थोडसं थांबलंच पाहिजे, पुढील कामासाठी निर्माण होणाऱ्या ऊर्जेसाठी… !! असे विविध अर्थ निघतात.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग ४ 

Category:

 

रंगांसंबंधी आपण गेल्या तीन लेखांद्वारे माहिती घेतली. या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु.

ह्या नक्षत्रावर ज्या व्यक्तिचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तिने दैनंदिन व्यवहारात कोणकोणत्या बाबींचा विचार केल्यास अधिक सकारात्मक तसेच होकारात्मक वातावरण तयार होऊन स्वतःच्या कामांना अधिक गतिमान करता याचा विचार करावा…!!

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग ३

Category:

 

मागील लेखात आपण रंग किती प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला लाभदायक ठरतात यावर चर्चा केली – माहिती घेतली. या लेखात आपण रंगांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रंग हा घटक म्हणजे ‘स्वयंभू’ चैतन्य आहे. हे चैतन्य मनावर आणि त्यानंतर ‘मेंदू’ असलेल्या शरीरावर अधिराज्य गाजवते. आपला जन्म – जन्मवेळ – जन्म ठिकाण हे सारं एका ‘टाईम फॅक्टर’ मध्ये निश्चित बांधलेलं असतं. त्यानुसार जन्म कुंडली – जन्मराशी – अंकशास्त्रादी पुरातन आणि पारंपारिक शास्त्रांनी ‘त्या’ वेळेनुसार जन्म झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल मार्गदर्शनात्मक भाकित वर्तवलेले असते. यावर अनेक मत-मतांतरे आहेत. आपल्याला त्यात जायचे नाही. आपल्या विषयानुसार आपण राशी-नक्षत्र आणि जन्मवेळ इत्यादींची रंगांबरोबर सांगड घालून, त्याप्रमाणे आपल्यावर काय काय तसेच कोणते सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे प्रत्येक नक्षत्रानुसार पाहणार आहोत.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग २

Category:

 

रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते.  उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.

No Picture
लेखसंग्रह

रंग चिकित्सा – भाग १ – एक आश्वासक उपचार

Category:

 

आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच  फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”..  !!  “रंगोपचार”…  म्हणजे काय?  तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे  अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो…  रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!!