ठाणे म्यूझिक फोरम
Category:
लेखसंग्रहतर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे! }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले ! २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळयांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय ! अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर ! या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि ! कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर मंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले ! तीन दिवस कान तृप्त झाले ! बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल ? फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल