माझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)
Category:
साहित्य - ललितपणजोबा असतांना एकदा सुप्रसिध्द सरन्यायाधीश श्री छागला हे त्यांना भेटायला घरी आले. न्यायमूर्ती तेंडोलकरांचे ते मित्र आणि सहकारी. कोल्हापूरात काही कामानिमित्त आले होते. ते आवर्जून पणजोबांच्या भेटीला येणार होते. मग आजोबांनी आम्हा मुलांना कामाला लावले. कचेरी आणि बैठकीची खोली यांतली मोठी जाजमे ब्रशने साफ करून घेतली. दोन्ही खोल्यांमधे अनेक सुंदर तैलचित्रे मोठ्या मोठ्या फ्रेम्समधे लावलेली होती. त्यांच्याकडे आता दुर्लक्षच झालेली होतं. त्या उघडून चित्रं पूसून घेतली. मग ओल्या फडक्याने कांचा स्वच्छ करून घेतल्या. हे काम आम्हा तीन-चार मुलांना चार दिवस पुरलं.