साहित्य - ललित
दिवस आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे!
Category:
साहित्य - ललितकाँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते.