सर्पगंधा

(Gold)

सर्पगंधाचा सरळ सदाहरित १-३ फूट उंच क्षुप असतो.ह्याची पाने ३-७ इंच लांब व २-२१/२ इंच रूंद अण्डाकार अथवा भालाकार व तीक्ष्णाग्र असतात.पानांचा वरचा भाग गडद हिरवा व पृष्ठभाग हल्का हिरवा असतो.प्रत्येक काण्डपर्वातून ३-४ पाने निघतात.फुले पांढरी अथवा गुलाबी गुच्छामध्ये येतात.फळ मटराच्या आकाराचे कच्चे हिरवे व पिकल्यावर काळे होते.मुळ दृढ असून ४० सेंमी लांब व २ सेंमी व्यासाचे असते.

ह्याचे उपयुक्तांग मुळ असून हि चवीला कडू,उष्ण गुणाची,रूक्ष व निद्राजनन आहे.हि कफवातनाशक आहे.

चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:

१)झोप येत नसल्यास रात्री झोपताना तुपा सोबत सर्पगंधा देतात.

२)चवीला कडू असल्याने सर्पगंधा कृमीघ्न कार्य करते.

३)सर्पगंधा उच्च रक्तदाबाच ही वापरतात.

४)कडू चव असल्याने सर्पगंधा आमपाचक व ज्वरनाशक आहे.

५)उष्ण असल्याने सर्पगंधा आर्तवजनन आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४



Please Login to view Prime Content.