सोळाव्या शतकात माल्टामध्ये सरंजामदारांचे अस्तित्व होते. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टावर ताबा मिळविला. १८०५ मध्ये माल्टाची सत्ता पुन्हा सरदारांच्या हाती गेली. १८१४ मध्ये सार्वमतानुसार ब्रिटिशांना सार्वभौम म्हणून स्वीकारले. १९२१ मध्ये माल्टात स्वयंशासन आले.
१९७४ मध्ये माल्टा हा स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनला. १९७९ मध्ये ब्रिटनबरोबरचा संबंध संपुष्टात आल्यानंतर माल्टाने आपला तटस्थ दर्जा जाहीर केला.
वालेटा – वालेटा हे शहर माल्टाची राजधानी आहे. या शहरात १६ व्या शतकातील बराकी आणि अनेक मिनार आढळतात. दुसऱ्या महायुद्धात या शहराचे मोठेनुकसान झाले. या शहराची नोंद वारसा यादीत आहे.