लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे.
बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव ‘उदयगिरी’ होते. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘उदकगिरी’ या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे.
अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे.
सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.