गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे.
पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. पर्यटन व पर्यटनावर आधारित विविध उद्योग या शहरातील लोकांकडून चालवले जातात. अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्टब्लेअर या शहरातून गरचरमा येथे बसने जाता येते.
येथील लोकसंख्या ९४३१ इतकी आहे. संपूर्ण देशात या शहरातील स्त्री-पुरुष प्रमाण खुपच चांगले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५३ टक्के पुरुष, तर ४९ टक्के महिला आहेत. या शहरातील साक्षरतेचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथे एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के लोक साक्षर आहेत.