(User Level: User is not logged in.)

पॉडकास्ट

या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.

Sort By:

  • मराठीसृष्टी Talks – Season 2

    मराठी मनासाठी वाहिलेलं एक अनुभवी आणि दर्जेदार पोर्टल…Marathisrushti.com

    इथे फक्त मराठी बाणा दिसत नाही तर चर्चा होते जगभरातल्या अनेक चांगल्या गोष्टींची – माध्यम असतं आपली मराठी.

    लेखकांपासून संशोधकांपर्यंत, कलेपासून विज्ञानापर्यंत , गावखेड्यापासून सीमेपर्यंत अनेक माणसं जोडली गेली आहेत या प्रवासात…

    आणि आता आम्ही पुन्हा सज्ज होतोय एक नवीन रुप घेऊन पोडकास्टच्या या जगात , आपलं मराठीपण जपण्यासाठी, नवीन माणसं जोडण्यासाठी…Marathisrushti Talks च्या रूपात

    चला मग एकत्र येऊया या प्रवासात…

    जाणून घेऊया गोष्टी, माणसं , अनुभवकथन आणि अशी माहिती जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला फक्त आणि फक्त समृद्धच करत राहील

  • “संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

    आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्‍या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.

  • संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद

    भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.

  • कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

    सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.

  • माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

    श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

  • संगीतकार कौशल इनामदार

    मराठी अभिमान गीत हा मराठीतील एक फार भव्य आविष्कार… शेकडो कलाकारांनी हजारो तासांच्या मेहनतीने ही भव्य कलाकृती उभी केली. यामागे प्रेरणा होती सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची. अभिमानगीताची गोष्ट तर आपण बर्‍याचदा ऐकली असेल. आज संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकूया.

  • सगळ्यात सोप्पी Retirement Strategy

    धन दौलत या अमुक तमुकच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतोय; पैसा, भविष्य आणि रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल…

    खरंच, रिटायरमेंटची तयारी कधी सुरू करावी? ३०च्या आत सुरू करायचं का, की अजून वेळ आहे? ‘आज आहे, उद्या कुणी पाहिलंय’ या YOLO mindset मुळे आपल्याला नंतर पश्चाताप होणार आहे का? Emergency fund म्हणजे फक्त मोठ्या लोकांचा game आहे का? आणि future health expenses प्लॅन करताना खरोखर काय लक्षात घेतलं जातं? या आणि अशाच अनेक गोष्टी, ज्याचा विचार आपण आज करतो का? की फक्त पुढे ढकलतोय? मुकुंद लेले, संपादक सकाळ Money सर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन या एपिसोड मध्ये करत आहेत.

     

  • सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

    Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.

  • काशी मध्ये असलेली शिवलिंग आणि त्याची रहस्य!

    सनातनी हिंदू धर्मात ज्या स्थानाला महत्व आहे ते म्हणजे काशी ज्याला आपण वाराणसी देखील म्हणतो. ह्या जगातील सर्वात जुनी नगरी म्हणून काशी चा उल्लेख केला जातो. ह्या स्थानचं महात्म्य काय आहे? कोणत्या गूढ गोष्टी ह्यात लपलेल्या आहेत? काशी विश्वनाथ, भैरव मंदिर, कामख्या मंदीर व इतर अनेक मंदिरांबद्दलची गूढ माहिती आपल्या ह्या पॉडकास्ट मधून मिळणार आहे व त्यासाठी आपल्यासोबत आहेत हर्षद सप्तर्षी.

    1 Hour 41 Min

  • सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत

    चित्रपट संगीतक्षेत्रात संगीतकार जोड्यांचा एक सुरेल इतिहास आहे. त्याच धर्तीवर चित्रपटातल्या गाण्यांना मेलोडियस संगीत देणारी मराठी संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी मराठी असले तरी फक्त मराठी संगीतक्षेत्रापुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी हॉलिवूड पर्यंत नेला आहे. सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत मराठीसृष्टी टॉक्स वर धनश्री बरोबर संवाद साधत आहेत