नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.

साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.

काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय…

स्टीव्हनसनचे वाङ्मय खूप प्रसिध्द आहे. डाॅक्टर जेकील आणि हाईड ही त्याची दीर्घकथा सर्व वाचकांच्या व सिनेरसिकांच्या परिचयाची आहे. अवघ्या ४४ वर्षांच्या (आतापर्यंतचे तीनही लेखक ॲास्कर वाईल्ड ४६, अँटन चेकॉव्ह ४४ आणि स्टीव्हनसन ४४ अल्पवयीच म्हणायचे) आंतच चौदा कादंबऱ्या आणि सहा कथासंग्रह लिहिले.
त्याने अरेबियन नाईटस् या नांवाखाली युरोपबद्दल सुरस कथा लिहिल्या. ट्रेझर आयलँड ही त्याची कादंबरीही प्रसिध्द आहे.

बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले. आता ते उताराच्या रस्त्याला लागले. हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं. तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….

राजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला……. राज नीलला… ‘माझा नील…माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा…. दादा…’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss… दीsssss… थांब’ असे म्हणत धावत निघाली…..

आमच्या समोर ती नवीन नवरी म्हणून रहाण्यास आली असेल मी ८ ते १० वर्षाचा. त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते . आम्ही मुले-मुली खेळत असू.

पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून…
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू…
आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला. तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात…बाया तरी काय करत्याल ?

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले.
Copyright © 2025 | Marathisrushti