सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो.
व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
अमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.
अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत.
मुंबईच्या समुद्र किनार्यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो. युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा घोषित केले आहे.::
उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपर्यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात.
श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो.
सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात.
१५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
यातील वृक्ष उंच असून, वर्षभर हिरवी नसतात. यात बांबू, शिसव, कदंब, बेन, रानफणस, वावली, हिट्टी इत्यादी जातींचे वृक्ष आढळतात.
वनाती लाकूड इमारत व फर्निचरसाठी उपयुक्त आहे.
चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिध्द शहर आहे. डोंगर, दर्या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या उत्सवातून नवीन पिढीला अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे ज्ञान दिले जाते.
निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.
मुंबईपासून दक्षिणेस केवळ ७८ किलोमीटर आणि पेणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागला आता मुंबईहून थेट समुद्रमा्गे जेमतेम अर्ध्या तासात जाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या गर्दीपासून दूर पण तरीही येण्या-जाण्यासाठी सोपे म्हणून अलिबागला सेकंड होम घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
हे शहर येथील समुद्र किनारा आणि सीफूडसाठी प्रसिध्द आहे. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही अष्टागरे म्हणून ओळखली जाणारी गावे अलिबागच्या आसपास आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti