(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • पुण्याची मंडई

    तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या 'क्रॉफर्ड मार्केटच्या' धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला. मंडईसाठी शुक्रवार पेठेतील सरदार खासगीवाले यांची बागवजा मोकळी पडलेली चार एकराची जागा ४० हजार रुपयांना खरेदी करून पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक वासुदेव बापुजी कानिटकर यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली.

    जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करून अष्टकोनी विस्तृत उंच टॉवर असलेली इमारत अडीच तीन वर्षात उभी केली. त्यावेळचे गव्हर्नर 'लॉर्ड रे' यांच्या हस्ते १८८६ रोजी या 'रे मार्केटचे' शानदार उदघाटन झाले. पुढे १९३९-४० साली आचार्य अत्रे यांनी या वास्तुचे 'महात्मा फुले मंडई' असे नामकरण केले.

  • दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

    लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान - मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर - भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे.

    स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली हे मुंबईच्या अधिपत्याखाली होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामात हे शहर आघाडीवर होते. १ मे १९९९ पर्यंत हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग होते. त्यानंतर हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा आस्तित्त्वात आला.

    औंढा नागनाथ- हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे.

  • कर्नाटकची राजधानी बंगलोर

    कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगलोर हे शहर देशातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग असल्याने या शहराला देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते.

    बंगलोर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर वसलेले असल्याने येथील हवामान आल्हाददायक आहे. त्यामुळेच पर्यटकांचीही या शहराला प्रथम पसंती असते.

    बंगलोर हे शहर उद्यानांचे व तलावांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. या शहरात एकूण सात तलाव असून लाल बाग, कबन पार्क, नंदी मंदिर, बनेरघट्टा उद्यान, बंगलोर किल्ला, टिपू महाल, इस्कॉन मंदिर आदी पर्यटनस्थळे प्रसिध्द आहेत.

  • पुण्याची पर्वती टेकडी

    पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्‍या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

    पर्वती टेकडी आणि त्यावरील मंदिरे तसेच पेशव्यांचे वस्तुसंग्रहालय ही पुणे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

    मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. २३ एप्रिल १७४९ रोजी या मंदिराची स्थापना करण्यात आली.

    पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.

    पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे जून १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले.

  • कर्णाने वसविलेले शहर कर्नाल

    कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.

    महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.

    उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.

  • नागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर

    नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे.

    लोटस टेम्पल या नावाने या मंदिराची ओळख आहे. सर्वश्रेष्ठ क्रॉंक्रीट रचनेसाठी या मंदिराला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. दीक्षाभूमीनंतर बौध्द बांधवांचे हे दुसरे पवित्र प्रार्थना स्थळ आहे.

  • ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हा

    सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते.

    जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीतही क्रांती झाली आहे.

  • अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

    गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे.

  • प्रागचा किल्ला

    प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.

  • आदिलशाही पॅलेस

    गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.