खुनी दरवाजा दिल्ली येथे आहे.
सत्तासंघर्षात औरंगजेबाने त्याचा भाऊ भाईदारा शिकोह याचे याचे धड शिरापासून वेगळे केले होते.
१८५७ मध्ये इंग्रजांनी शेवटचा बादशहा जफर यांच्या दोन मुलांना येथेच गोळ्या घातल्या होत्या.
साबरमती नदीच्या पश्चिम किनार्यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले.
चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली.
स्वामीनारायण संप्रदायाचे प्रसिध्द स्वामीनारायण मंदिर येथील आकर्षण आहे.
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.
त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे आहे. सन १८९९-१९०१ या कालावधीत महाराजा राधाकिशोर माणिक यांनी या महलाची निर्मिती केली.
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.
उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, गणपतीपुळे, मुरुड, केळशी, भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यावर परतीचा प्रवास गोड करण्यासाठी आणि या आनंददायी सफरीच्या आठवणी घरापर्यंत पोहचविण्यासाठी सोबत असतो तो कोकणचा मेवा...आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे... कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
रत्नागिरी जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून दाट वनराई आढळते. डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात.
कोकणात मिळणाऱ्या या मेव्यामुळे उन्हाळ्यातली ही सफरही आनंददायी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तिकडे हा मेवा पाठविण्यासाठी कुरिअरची मदतही घेतली जाते. कोकणी मेव्याने रोजगाराची आणि तेवढ्याच 'मधूर' संबंधाची अशी साखळीच तयार केली आहे. 'कोकणच्या राजा' ने रत्नागिरीचे नाव सर्वदूर पोहोचविले असले तरही कोकणचा इतरही मेवा सर्वांच्या पसंतीस उरला आहे.
प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.
गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे दीपगृह आहे. प्रकाशासाठी प्रसिध्द असलेल्या हे टॉवर अतिशय प्रेक्षणीय आहे. बंदरावर येत असलेल्या जहाजांना दिशादर्शक म्हणून दीपगृहाचा उपयोग होतो.
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
भौगोलिक माहिती
गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
किल्ल्याबद्दल
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
Copyright © 2025 | Marathisrushti