महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर होय.
१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता.
मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले.
भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.
जगातील अनेक इमारती आपल्या खास वैशिष्ठ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत. अमेरिकेतही अशा बर्याच इमारती आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन लुई अेबिस्पो काऊंटी मधील क्यूस्टा एनकान्डाटा नावाचा महालसुद्धा असेच लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. दाट जंगलात आणि डोंगरमाथ्यावर असलेला हा महाल “हर्स्ट कॅसल” या नावाने ओळखला जातो. ९० हजार चौरस फूटांपेक्षाही अधिक जागेत या महालाचा पसारा आहे.
हा महाल पत्रकार विलियम रंडोल्फ हर्स्ट यांच्यासाठी १९१९ ते १९४७ या काळात बांधला गेला. १९५१ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर तो कॅलिफोर्निया प्रशासनाकडे आला. १९५७ मध्ये या महालाला पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करण्यात आले. दरवर्षी या महालाला किमान १० लाख पर्यटक भेट देतात.
हर्स्ट यांच्या काळात येथे हॉलीवूड कलाकार, राजकारणी, नेतेमंडळी वगैरेंची मोठी वर्दळ असे.
या महालात ५६ बेडरूम्स, ६१ टॉयलेट, १९ सिटींग रूम्स, १२७ एकरात पसरलेला बगीचा, इनडोअर, आऊटडोअर स्विमिग पूल, टेनिस कोर्ट, मूव्ही थिएटर, रॉयल लायब्ररी, डायनिंग, ज्वेल बॉक्स, एअर फिल्ड आणि सर्वात मोठे खासगी झू आहे.
राजस्थानमधील जयपूर शहरात प्रसिध्द बी. एम. बिरला आंतरराष्ट्रीय सभागृह आहे. या सभागृहात १३५० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे सभागृह आहे.
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.
रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी...
मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कोसलाकार लेखक भालचंद्र नेमाडे यांची ही जन्मभूमी... मध्य प्रदेश जवळ असल्यानं इथल्या नागरिकांवर ब-हाणपूर, इंदोरचा पगडा आहे. मराठीसोबतच तावडी ही लेवा पाटील समाजाची बोलीभाषा हे या मतदारसंघाच वैशिष्ट.. वांग्याचं भरीत आणि वरण बट्टी या स्वादासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर.... खान्देशात मोडणारा हा भाग महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी संस्कृती टिकवून आहे ..
रेल्वेने हे शहर देशाशी जोडलेले असून, ते रेल्वेच्या भुसावळ विभागात येते.
उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे.
१३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे.
इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो.
देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti