
बॅप्टिस्ट चाइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून मंगळावर आवाजाला ‘दुहेरी’ वेग असल्याचं तर दिसून आलं आहेच; परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, सर्वच प्रकारच्या आवाजाच्या वेगात दिवसातील वेळेनुसार होणारा लक्षणीय बदल. मंगळावरच्या सकाळनंतर सर्वच ध्वनिलहरींचा वेग हळूहळू वाढत जाऊन मध्यान्हीच्या सुमारास तो कमाल पातळी गाठतो. त्यानंतर कमी होत-होत संध्याकाळपर्यंत तो बराच कमी झालेला असतो.

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!

जर्मनीतील बव्हेरिआ प्रांतात फ्रँकोनिअन जुरा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश टेरोसॉर आणि तत्सम अतिप्राचीन सरीसृपांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. टेरोसॉर हे सरीसृप, डायनोसॉर या सरीसृपांचे भाऊबंद होते. ते उडणारे सरीसृप म्हणून ज्ञात आहेत. त्यांना पंख होते. मात्र हे पंख पिसांपासून बनलेले नव्हते, तर ते उतींपासून बनलेले होते. जगभरच्या इतर ठिकाणांप्रमाणेच फ्रँकोनिअन जुरामध्येही टेरोसॉरच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत.

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे.

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात.

समुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते.

सजीवांच्या उत्क्रांतीत डायनोसॉर या सरीसृपांचं महत्त्व मोठं आहे. पृथ्वीवर सस्तन प्राण्यांचं राज्य येण्याच्या अगोदर, तब्बल अठरा कोटी वर्षं या डायनोसॉरनी पृथ्वीवर राज्य केलं. त्यामुळे संशोधकांना डायनोसॉरबद्दल प्राणिशास्त्राच्या दृष्टीनं उत्सुकता तर आहेच, परंतु त्यांना या प्राण्यांंच्या सामाजिक जीवनाबद्दलही कुतूहल आहे. संशोधकांना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न म्हणजे – ‘हे डायनोसॉर एकएकटे वावरायचे की कळपात वावरायचे? कळपात वावरत असल्यास ते केव्हापासून कळपात वावरू लागले?’.

आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत.

गॅलिलिओनं सोळाव्या शतकाच्या अखेरीस, पिसा इथल्या झुकलेल्या मनोऱ्यावरून केलेला एक कथित प्रयोग सर्वपरिचित आहे. या प्रयोगात गॅलिलिओनं वेगवेगळ्या वजनाचे दोन गोळे पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावरून खाली टाकले व हे गोळे जमिनीवर पोचायला लागणारा वेळ मोजला

आइन्स्टाइन यांचं म्हणणं आज अचूक ठरलं आहे. माणूस ज्या संवेदनांचा वापर करू शकतो, त्याशिवाय इतर प्रकारच्या संवेदना सजीवांकडे असल्याचं त्यानंतर काही काळातच सिद्ध झालं. या इतर संवेदना म्हणजे, पृथ्वीचं चुंबकत्व, विद्युतक्षेत्र, वगैरे, ओळखण्याची क्षमता. यातील काही प्रकारच्या संवेदनांचा वापर विविध सजीव हे दिशा शोधण्यासाठी करत असल्याचे पुरावे गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच सापडले आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti