बिरबलाची माकडीण
Category:
कथा साहित्य - ललिततसं पाहता शोभाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे म्हणता येण्यासारखे प्रसंग मोजकेच होते… वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं… त्यानंतर -ती आणि तिची आई- एवढंच तिचं विश्व ! घरची परिस्थिती बेताचीच. शोभाचे वडील एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या मृत्युनंतर कंपनीतर्फे मिळालेली खोलीदेखील सोडावी लागली होती. त्यामुळे दोघी मायलेकी अक्षरशः रस्त्यावर आल्या होत्या. पण शोभाच्या मामाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने त्याच्या घरालगत असलेल्या एका छोट्या खोलीत दोघींची राहायची सोय करून दिली. ‘मी यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत त्याने दोघींची बोळवण केली होती.