ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.