नागपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेडॉ.हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केली. यांचे बालपण नागपुरातच गेले व यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यांना रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक म्हटले जाते.त्यांनी अविवाहित राहून राष्ट्रकार्य करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी रा. स्व. संघाच्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण केला. त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र नागपूरच होते.